सिडकोची एकात्मिक सीसीटीव्ही यंत्रणा

By Admin | Updated: August 22, 2014 00:29 IST2014-08-22T00:29:03+5:302014-08-22T00:29:03+5:30

पनवेल, खारघर, द्रोणागिरी परिसरामध्ये एकात्मिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

CIDCO's integrated CCTV system | सिडकोची एकात्मिक सीसीटीव्ही यंत्रणा

सिडकोची एकात्मिक सीसीटीव्ही यंत्रणा

नवी मुंबई : पनवेल, खारघर, द्रोणागिरी परिसरामध्ये एकात्मिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. महत्वाच्या 3क्4 ठिकाणी 584 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शासनाने सर्व शासकीय यंत्रणांना त्यांच्या कार्यक्षेत्रमध्ये सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी उद्योजकांनाही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. सिडको क्षेत्रमध्येही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी शहरात टेहळणी यंत्रणा बसविण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. ही यंत्रणा स्थापीत करण्यासाठी जागतीक स्तरावर निवीदा मागविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. खारघर, कामोठे, उलवे, द्रोणागिरी व पनवेल परिसरामधील टोलनाके, वाहतुक चौक, अपघातप्रवण क्षेत्र, रेल्वे स्टेशन, शाळा, सागरी किनारे, बोटींसाठीचे धक्के अशा परिसरात कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 
शहरातील 3क्4 ठिकाणी 584 कॅमेरे बसविण्याची ही योजना आहे. प्रारंभी सिडको क्षेत्रतील 2क् खाजगी आणि सरकारी कॅमेरे सिडकोच्या यंत्रणोशी जोडले जाणार आहेत. भविष्यात त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. या यंत्रणोसाठी 35 कोटी 79 लाख एवढा प्राथमीक खर्च आहे. 5 वर्षानी देखभाल आणि कार्यान्वीततेवर 3क् कोटी 6क् कोटी खर्चाची तरतूद सिडको करणार आहे.  (प्रतिनिधी)
 
पोलिसांशी समन्वय
सिडको सीसीटीव्हीची यंत्रणा पोलिस आयुक्तालयाशी जोडली जाणार आहे. सर्व दृश्य पोलिस आयुक्तालयातील केंद्रात एकत्रित करून दीर्घकाळ साठवून ठेवण्याची सोय केली जाणार आहे. या यंत्रणोमध्ये 1क् आपत्कालीन दूरध्वनी कक्ष, 2क् सार्वजनिक संदेशवाहक केंद्र व विविध सूचना देणा:या फलकांचा समावेश असणार आहे. 

 

Web Title: CIDCO's integrated CCTV system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.