वर्षभरात सिडकोच्या ८१ अधिकाऱ्यांवर कारवाई

By Admin | Updated: September 5, 2016 02:38 IST2016-09-05T02:38:51+5:302016-09-05T02:38:51+5:30

सिडकोतील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षांपूर्वी दक्षता विभागाची स्थापना केली.

CIDCO's 81 officers have taken action during the year | वर्षभरात सिडकोच्या ८१ अधिकाऱ्यांवर कारवाई

वर्षभरात सिडकोच्या ८१ अधिकाऱ्यांवर कारवाई


नवी मुंबई : सिडकोतील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी तीन वर्षांपूर्वी दक्षता विभागाची स्थापना केली. या विभागाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या तक्रारी असलेल्या सिडकोच्या ८१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यापैकी २७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विविध ३0 विभागांच्या माध्यमातून सिडकोचा कारभार चालतो. या प्रत्येक विभागातील कारभार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त व्हावा, यासाठी दक्षता विभागाच्या माध्यमातून विशेष प्रयास केले जातात. लोकांच्या आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेवून त्याची चौकशी केली जाते. २0१५-१६ या आर्थिक वर्षात दक्षता विभागाला ४४९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी बहुतांशी तक्रारी अभियांत्रिकी, इस्टेट आणि भूमी व भूमापन विभागाशी संबंधित आहेत. या तक्रारी निकाली काढतान दक्षता विभागाने २७ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस प्रशासनाला केली आहे. तर कामांत हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून ४१ कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. दोन कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले. ५ कर्मचाऱ्यांना लेखी समजत तर एका कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नेमणूक करण्यात आली. भ्रष्टाचाराविषयीच्या तक्रारींत घट व्हावी, असेच त्यांचे प्रयत्न होते. सध्या विभागाचे प्रमुख म्हणून विनय कारगावकर हे काम पाहत आहेत. त्यामुळे जुन्या तक्रारींचा निपटारा करण्याबरोबरच भ्रष्टाचाराशी संबंधित नवीन तक्रारीत वाढ होवू नये, या दृष्टीने ठोस उपाययोजनेची गरज आहे.
>भ्रष्टाचार निर्मूलनासाठी उपाययोजना
भ्रष्टाचाराच्या विविध तक्रारींमुळे मलिन झालेली सिडकोची प्रतिमा सुधारण्यासाठी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दक्षता विभागाची स्थापना केली होती.
पोलीस महासंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांची नेमणूक करण्यात आली. डॉ. सरवदे यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीने विविध उपाययोजना आखल्या.

Web Title: CIDCO's 81 officers have taken action during the year