शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CIDCO Land Scam Case : आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या, सिडको प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 12:56 IST

पावसाळी अधिवेशनाच्या आज दुस-या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नागपूर- पावसाळी अधिवेशनाच्या आज दुस-या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सिडको जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. विरोधी पक्षांनी अर्धी वस्तुस्थिती मांडली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या गेल्या आहेत.आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर जमिनीचं वाटप झालं होतं. या जमिनी जिल्हाधिका-यांच्या अखत्यारितील आहेत. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याधिका-यांचे अधिकार वाढवण्यात आले. जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे.सिडको प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करू, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. सिडकोच्या जमीन वाटप प्रकरणासह यापूर्वीच्या सरकारमध्ये अशाच प्रकारे देण्यात आलेल्या 200 जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मी काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे दुसऱ्यावर दगड मारण्यापूर्वी विचार करा, मी राजीनामा देणार नाही, पण तुम्ही खोटे आरोप केलेत म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामे द्यावेत, असा पवित्राही मुख्यमंत्र्यांनी घेतला. विरोधकांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी यासाठी सत्ताधारी आमदार आक्रमक झालेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८cidcoसिडकोcongressकाँग्रेस