'अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे'ची सीआयडी चौकशी करा - सनातन

By Admin | Updated: October 19, 2015 18:47 IST2015-10-19T18:05:37+5:302015-10-19T18:47:02+5:30

नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यांच्या संस्थेची सीआयडी चौकशी करावी

CID inquire about 'Andhashradha Nirmoolan Sanstha' - Sanatan | 'अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे'ची सीआयडी चौकशी करा - सनातन

'अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे'ची सीआयडी चौकशी करा - सनातन

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १९ - नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यांच्या संस्थेची सीआयडी चौकशी करावी, सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल, असा आरोप सनातन प्रभातचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. या प्रकरणी कारवाईसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान सनातन जोरदार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगली येथील पत्रकार परीषदेत सांगितले . दाभोलकर खून प्रकरणी जशी सनातनची चौकशी झाली तशी श्याम मानव यांच्यासह त्यांच्या बरोबर असणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
श्याम मानव हे मानसिक रोगी असून त्यांना आता विश्रांतीची गरज असल्याचा टोला अभय वर्तक यांनी लगावला आहे. हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र करण्यात आले आहे. यामागे शरद पवारांसारखे नेते आहेत, असाही आरोप अभय वर्तक यांनी केला आहे.
भाजप सरकारच्या काळात आमच्यावर कारवाई होणार नाही ही अपेक्षा आहे. जर या ठिकाणी काँग्रेस सरकार असते तर आमच्यावर बंदी घातली असती. हिंदू विरोधी टीका करून लेखन केल्यामुळेच पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना पुरस्कार मिळाले आहेत. हे फक्त पुरस्कार परत करत आहेत. पण यांना १० टक्के कोट्यातून शासनाने दिलेली घरे हे साहित्यिक परत का देत नाहीत ? पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: CID inquire about 'Andhashradha Nirmoolan Sanstha' - Sanatan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.