शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सीआयडी उपअधीक्षकाची आत्महत्या, बढती न मिळाल्याने नैराश्यातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 04:04 IST

सांगली येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (५१, रा. देवल कॉम्प्लेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी घरात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

सांगली : येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश उर्फ सखाहरी गिरजाप्पा गडदे (५१, रा. देवल कॉम्प्लेक्स, विश्रामबाग) यांनी गुरुवारी सकाळी घरात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. नोकरीत बढती न मिळाल्याच्या नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.सांगली-मिरज रस्त्यावरील देवल कॉम्प्लेक्समधील तिसºया मजल्यावर गडदे हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते सांगली सीआयडी क्राइम ब्रँचकडे उपअधीक्षक म्हणून रुजू झाले होते. तीन दिवसांपासून ते रजेवर होते. सकाळी सातच्या सुमारास त्यांनी फ्लॅटच्या गॅलरीत सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. या वेळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले झोपेत होती. सकाळी आठच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर त्यांना गडदे गॅलरीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यावर मोठा धक्का बसला.अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गडदे यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधील सहा गोळ्या होत्या. त्यापैकी चार गोळ्या त्यांनी गादीवरील उशीखाली ठेवल्या होत्या, तर दोन गोळ्या रिव्हॉल्व्हरमध्ये लोड केल्या होत्या. त्यापैकी एक गोळी उडाली, तर दुसरी गोळी रिव्हॉल्व्हरमध्येच अडकून राहिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.तीन पानी पत्रशिस्तबद्ध अधिकारी अशी ओळख असलेल्या महेश गडदे यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानी पत्र लिहिले आहे. त्यातील मजकूर पोलिसांनी उघड केला नसला तरी, सातत्याने ‘साइड पोस्टिंग’मुळे त्यांना नैराश्य आले होते, असे समजते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांनाही पत्र लिहिले होते. पण त्याची दखल घेतली गेली नाही. या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे मत आहे. आत्महत्येला घरातील कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी या पत्रात म्हटल्याची चर्चा घटनास्थळी होती.वडील, भाऊही पोलीस खात्यातमहेश गडदे यांचे वडील गिरजप्पा पोलीस खात्यात फौजदार होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे भाऊ गणेश साहाय्यक पोलीस निरीक्षक असून ते तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र