कल्पना गिरी प्रकरण सीआयडीकडे
By Admin | Updated: May 11, 2014 00:02 IST2014-05-10T22:08:00+5:302014-05-11T00:02:59+5:30
येथील बहुचर्चित युवक काँग्रेस पदाधिकारी ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाचा तपास आता पुणे सीआयडीकडे सोपविण्यात येत आहे़

कल्पना गिरी प्रकरण सीआयडीकडे
पोलीस महासंचालकांचा आदेश
लातूर : येथील बहुचर्चित युवक काँग्रेस पदाधिकारी ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाचा तपास आता पुणे सीआयडीकडे सोपविण्यात येत आहे़
ॲड़कल्पना गिरी खून प्रकरणाने ऐन लोकसभा निवडणुकीत खळबळ उडवून दिली होती़ या प्रकरणात युवक काँग्रेसचा पदाधिकारी महेंदसिंह चौहाण, समीर किल्लारीकर, श्रीरंग ठाकूर, हॉटेल व्यवसायिक प्रभाकर शेी यांना अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, पोलिसांच्या रडारवर आणखी दोन संशयित होते़ त्यांना ताब्यात घेण्यापूर्वीच शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तपास पुणे सीआयडीकडे हस्तांतरीत करण्याचा आदेश धडकला़
दरम्यान, पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कागदपत्रे त्यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत़ पोलिस अधीक्षक बी़जी़ गायकर यांच्याकडून ही सूचना तपास अधिकारी बी़जी़ मिसाळ यांना देण्यात आली आहे़ सोमवारी ते ही कागदपत्रे घेऊन महासंचालकांकडे रवाना होणार आहेत़ तेथूनच मग ही कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत़