साखर कारखान्यांची धुराडे थंडावली
By Admin | Updated: May 8, 2015 00:48 IST2015-05-08T00:47:30+5:302015-05-08T00:48:37+5:30
विभागाचा राज्यात उच्चांकी : १२.५३ सरासरी साखर उतारा

साखर कारखान्यांची धुराडे थंडावली
प्रकाश पाटील - कोपार्डे -हंगाम २०१४-१५ मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच कारखान्यांनी आपले हंगामातील गाळप उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. कोल्हापूर विभागात दोन कोटी ११ लाख ९० हजार ९६७ मे. टन उसाचे गाळप करत ३७ साखर कारखान्यांनी १२.५३ च्या सरासरी साखर उताऱ्यासह २ कोेटी ६५ लाख ५७ हजार २८६ क्विंटल साखर उत्पादन करून आजवरचा सर्वाधिक ऊस गाळपाचा उच्चांक निर्माण केला आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांना योग्य पाऊस व उसाचे वेळेत झालेले गाळप यामुळे हेक्टरी ८३ ते ८५ मे. टन उत्पादन मिळविण्यात यश मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी गाळप हंगाम यशस्वी केले. ‘दत्त दालमिया’ ने १३.३४ सरासरी साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे, तर राज्यात उताऱ्यात आघाडी घेतली, तर ‘जवाहर’ ने गाळपात आघाडी घेताना १५ लाख २०० मे. टनाचे गाळप केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एक कोटी ३४ लाख ६६ हजार ३५४ मे. टन उसाचे गाळप करत एक कोटी ७१ लाख ३३ हजार १८८ क्विंटल साखरेचे उत्पादन करताना १२.७२ असा राज्यात उच्चांकी सरासरी साखर उतारा मिळविला आहे.
सांगली जिल्हा
एकूण साखर कारखाने : १८
गाळप हंगाम पूर्ण करणारे : १६
बंद कारखाने : ०२
एकूण उसाचे गाळप : ७७ लाख २४ हजार ६१३ मे. टन
एकूण साखर उत्पादन : ९८ लाख ७९ हजार १२३ क्विंटल
सरासरी साखर उतारा : १२.७९
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व, तर सांगली जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता
कोल्हापूर विभागात (कोल्हापूर, सांगली) दोन कोटी ११ लाख ९० हजार ९६९ मे. टन उसाचे उच्चांकी गाळप
या हंगामात तब्बल २८ लाख मे. टन उसाचे विभागातील साखर कारखान्यांकडून जादा गाळप
कोल्हापूर विभाग (कोल्हापूर व सांगली)
एकूण साखर कारखाने : ४१
गाळप हंगाम घेणारे : ३७
बंद कारखाने : ०४
एकूण उसाचे गाळप : २ कोटी ११ लाख ९० हजार ९६७ मे. टन
एकूण साखर उत्पादन : २ कोटी ६५ लाख ५७ हजार २८६ क्विंटल
सरासरी साखर उतारा : १२.५३
कोल्हापूर जिल्हा
एकूण साखर कारखाने : २३
गाळप हंगाम पूर्ण करणारे : २१
बंद कारखाने : ०२
एकूण उसाचे गाळप : एक कोटी ३४ लाख ६६ हजार ३५४ मे. टन
एकूण साखर उत्पादन : एक कोटी ७१ लाख ३३,१८८ क्विंटल
सरासरी साखर उतारा : १२.७२