क्रिसलर वाहननिर्मिती वाढविणार
By Admin | Updated: July 2, 2015 00:48 IST2015-07-02T00:48:43+5:302015-07-02T00:48:43+5:30
वाहननिर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीच्या क्रिसलर समूहाने पुण्याजवळील रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करून २०१८ पर्यंत २ लाख ४५ हजार वाहनांची

क्रिसलर वाहननिर्मिती वाढविणार
मुंबई : वाहननिर्मितीच्या क्षेत्रातील आघाडीच्या क्रिसलर समूहाने पुण्याजवळील रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करून २०१८ पर्यंत २ लाख ४५ हजार वाहनांची निर्मिती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिका दौऱ्यात दिले.
जनरल मोटर्सनेही महामार्गावरील संपर्क यंत्रणेबाबतच्या तंत्रज्ञान निर्मितीत रस दाखवला आहे. डेट्रॉइट येथील जनरल मोटर्स व क्रिसलर या वाहननिर्मिती उद्योगांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट दिली. क्रिसलर उद्योग समूहाचे अध्यक्ष माइक मॅन्ले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना रांजणगाव प्रकल्पातील वाहननिर्मिती क्षमता दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष मॅट हॉब्ज आणि मुख्य अर्थतज्ज्ञ जी. मुस्तफा मोहतरेन यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जनरल मोटर्स राज्यातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याबाबत विचार करीत असून, वाहननिर्मितीखेरीज महामार्गावरील संपर्क यंत्रणेबाबतच्या तंत्रज्ञान निर्मितीत त्यांनी रस दाखवला. डेट्रॉइट येथील आयोजित महाराष्ट्र व्यापार विकास परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. (विशेष प्रतिनिधी)