कोंथिंबीर कडाडली
By Admin | Updated: June 23, 2014 22:09 IST2014-06-23T22:09:09+5:302014-06-23T22:09:09+5:30
पाऊस पडत नसल्याने मेथी-कोथिंबिरीचे उत्पादन होत नाही. बाजारात या दोन्ही मालाची आवक अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे मेथी कोथिंबिरीचे बाजारभाव कडाडले आहेत.

कोंथिंबीर कडाडली
>मंचर : पाऊस पडत नसल्याने मेथी-कोथिंबिरीचे उत्पादन होत नाही. बाजारात या दोन्ही मालाची आवक अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे मेथी कोथिंबिरीचे बाजारभाव कडाडले आहेत. कोथिंबिरीची एक जुडी 4क् रुपयाला, मेथी जुडी 22 रुपयांना विकली गेली.
पावसाने मोठया प्रमाणावर ओढ दिली आहे. तसेच वातावरणात प्रचंड उष्णता आहे. त्याचा परिणाम मेथी-कोथिंबीर पिकावर झाला आहे. पाणी उपलब्ध नसल्याने या पिकाचे लागवड क्षेत्र घटले आहे. मेथी कोथिंबीरीचे उत्पादन नव्याने पाण्या अभावी घेता येत नाही. जेथे पाण्याची उपलब्धता आहे. तेथे काही शेतक:यांनी या पिकाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला मात्र तीव्र उष्णतेने मर होत आहे. शेतातील 2क् टक्के मालही बाजारात येत नाही. माल कमी प्रमाणात निघत असल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटली आहे. एरवी बाजार समितीच्या आवारात माल ठेवण्यास जागा नसते. आता मात्र मोजकेच Rीग दिसून येतात. माल चक्क पोत्यात भरुन शेतकरी आणतो. पूर्वी तोच माल टेम्पो-ट्रक्टरमधून आणला जायचा.
किरकोळ बाजारात कोथींबीर अभावानेच पहावयास मिळत आहे. यापुढील काळात पाऊस पडलाच नाही तर मेथी कोथींबीरीचे बाजारभाव कडाडणार असल्याची माहिती संदिप गांजाळे यांनी दिली. (वार्ताहर)
कोथिंबीर शेकडा 4500 रुपये
कोथींबीरीच्या बाजारभावाने शुक्रवारी शेकडा 45क्क्/- रुपयांचा टप्पा ओलांडला. रविवारी रात्री कोथिंबीरीच्या 9क्क्क् जुडबंची आवक होऊन शेकडा 39क्क्/- रुपये बाजारभाव मिळाला. मेथीच्या 11क्क्क् जुडींची आवक होऊन त्यास 22क्क्/- रुपये बाजारभाव मिळाला. या दोन्ही पिकांचे बाजारभाव वाढत आहेत.