कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना चपलांचा चोप
By Admin | Updated: July 25, 2016 14:00 IST2016-07-25T13:54:39+5:302016-07-25T14:00:07+5:30
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणा-या करणाऱ्या आरोपींना न्यायालयात नेताना काही महिलांनी मारहाण केली.
कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना चपलांचा चोप
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २५ - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणा-या करणाऱ्या घटनेतील आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना सोमवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात आणले असता महिलांनी आरोपीला चपलांचा चोप दिला़ यावेळी पोलिसांनी स्मिता आष्टेकरसह पाच ते सहा महिलांनी ताब्यात घेतले़
कोपर्डी घटनेतील भवाळ व भैलुमे यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी सकाळी साडेआकराच्या सुमारास त्यांना न्यायालयात आणले होते़ यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अष्टेकर यांनी आरोपींवर चप्पल भिरकावली़ याचवेळी दोन महिलांनी थेट पोलिसांच्या ताफ्यात घुसून आरोपींना चपलांनी चोपले़ दऱ्यान या दोन्ही आरोपीला ३ आॅगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फोटो : राजू शेख (नगर)