धारावीच्या प्रेमवीराला चोप
By Admin | Updated: November 23, 2014 01:54 IST2014-11-23T01:54:29+5:302014-11-23T01:54:29+5:30
धारावी झोपडपट्टीतून पलायन केलेल्या प्रेमी युगुलातील प्रेमवीराची युवतीच्या भावाने व आईने येथील महात्मा गांधी उद्यानात यथेच्छ धुलाई केली़

धारावीच्या प्रेमवीराला चोप
जळगाव : घरच्यांचा विरोधाला न जुमानता आठ दिवसांपूर्वी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतून पलायन केलेल्या प्रेमी युगुलातील प्रेमवीराची युवतीच्या भावाने व आईने येथील महात्मा गांधी उद्यानात यथेच्छ धुलाई केली़ युवतीच्या पालकांना हे प्रेमी युगुल जळगावात असल्याचे समजताच त्यांनी शहरात येवून त्यांचा शोध घेतला. शनिवारी दुपारी 3़3क् वाजेच्या सुमारास हे दोघे त्यांना महात्मा गांधी उद्यानात आढळून आल़े मात्र त्यानंतर हे प्रकरण नाटय़मय वळण घेत समारोप सुखद झाला़
गजानन विजय यंगड(28) असे त्या प्रेमविराचे नाव असून विजया (नाव बदललेले आहे) असे त्या युवतीचे नाव आह़े दोघेही मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये सोबत कामाला आहेत़ सोबत कामावर जाणो, परतणो यातून त्यांचे प्रेम फुलल़े गजानन यंगड
याच्या वडीलांनी ािश्चन धर्म स्विकारलेला आह़े युवती मराठा समाजाची आह़े
गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रेमाचा सिलसिला सुरू झाला होता़ काही दिवसांपूर्वी युवतीच्या भावाने दोघांना चौपाटीवर एकत्र बघितल़े त्या दिवशी तिला भावाने मारहाण केली होती़ त्यावेळी तिने गजाननसोबत लग्न करायचे असल्याचे पालकांना सांगितल़े मात्र त्यांनी विरोध केला़ गेल्या शनिवारी दोघांनी पलायन केले होत़े
हे युगुल जळगावातील मित्रकडे मुक्कामी थांबले होत़े त्यानंतर त्याने खोलीवर राहू देण्यास नकार दिल्यानंतर काही दिवस हॉटेलवर मुक्काम केला असल्याचे त्या
युवकाने सांगितल़े मात्र त्या
युवकाने मित्रचे नाव सांगण्यास
नकार दिला़ त्या मित्रनेच युवतीच्या वडीलांना कळविले, असा संशयही त्याने व्यक्त केला़
युवतीने केला विरोध
च्आई व भाऊ गजाननला मारत असताना युवती त्यांना विरोध करत ओक्साबोक्सी रडायला लागली़त्याला मारू नका, अशी विनवण्या करायला लागली़ मुलीच्या क्रोधापुढे अखेर पालकांना शरणागती पत्करावी लागली़ तिने पालकांसोबत परत जाण्यास नकार दिला़
च्गजाननसोबत लग्न लावून देण्याच्या अटीवर ती युवती मुंबईला परत जाण्यास तयार झाली़ परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पालकांनी दोघांचे लग्न लावून देण्यास होकार दिल्यानंतर युवती शांत झाली़ त्यानंतर मुलीसह त्या प्रेमीवीर युवकाला सोबत घेवून पालक मुंबईला रवाना झाल़े