नॅशनल गेम्ससाठी चौधरी यांची निवड
By Admin | Updated: December 30, 2014 23:25 IST2014-12-30T23:09:57+5:302014-12-30T23:25:39+5:30
२३ पेक्षा अधिक राज्यस्तरीय आणि १४ राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी भूमिका

नॅशनल गेम्ससाठी चौधरी यांची निवड
सांगली : केरळ येथे होणाऱ्या ३५ व्या नॅशनल गेम्ससाठी राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक सुरेश भिवा चौधरी यांची निवड झाली आहे.
या स्पर्धेत चौधरी हे महाराष्ट्राच्या तायक्वांदो संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. चौधरी हे तायक्वांदो खेळाचे राष्ट्रीय पंच असून वरिष्ठ प्रशिक्षकही आहेत. यापूर्वी त्यांनी २३ पेक्षा अधिक राज्यस्तरीय आणि १४ राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी भूमिका बजावली आहे. तायक्वांदो असोसिएशन आॅफ सांगली डिस्ट्रीक्टचे ते सचिव आहेत. चौधरींना संदीप ओंबासे, आबा झोडगे, आनंदराव नलवडे, भास्कर करकेरा यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)