पनवेलमधल्या 'त्या' चॉकलेट बॅगेचे गुढ कायम
By Admin | Updated: September 24, 2016 18:37 IST2016-09-24T18:30:58+5:302016-09-24T18:37:42+5:30
पनवेल मार्केट यार्डमध्ये एका सातवर्षाच्या मुलाकडे सापडलेल्या बॅगेमुळे उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. हा मुलगा पनवेल मार्केट यार्ड परिसरात रहातो.

पनवेलमधल्या 'त्या' चॉकलेट बॅगेचे गुढ कायम
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. २४ - पनवेल मार्केट यार्डमध्ये एका सातवर्षाच्या मुलाकडे सापडलेल्या बॅगेमुळे उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. हा मुलगा पनवेल मार्केट यार्ड परिसरात रहातो. शुक्रवारी सकाळी हा मुलगा आपल्या घराजवळ खेळत असताना गाडीमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी या मुलाच्या हाती एक बॅग दिली. या बॅगेमध्ये चॉकलेटस, ड्रायफ्रुट आणि एनर्जी ड्रींक असे सामान होते.
या घटनेची परिसरात सुरु झालेली चर्चा पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी येऊन या मुलाला आणि त्याच्या वडिलांना कालच ताब्यात घेतले. पोलिसांनी अजून दोघांना सोडले नसून, त्यांची चौकशी सुरु आहे. या मुलाचे वडिल पेशाने टेलर आहेत.
उरणमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी दहशतवाद्यांना पाहिल्याचा दावा केल्यामुळे आधीच सर्वच यंत्रणा प्रचंड सर्तक आहे. प्रत्येक संशयास्पद वाटणा-या गोष्टींचा पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.