शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Chitra Wagh : "आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा", आगीच्या दुर्घटनेवरून चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 4:52 PM

Chitra Wagh : आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या आगीच्या दुर्घटनेत 10 रूग्णांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या आगीच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फायर ॲाडिट केले आहे का? असा सवाल करत यावर श्वेतपत्रिका जारी करा, असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी आरोग्य मंत्र्यांच्या कामाचेच ॲाडिट करून हकालपट्टी करा, अशा शब्दांत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.   

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, "भंडारा, विरार, कोल्हापूरच्या घटनेनंतरही सरकारला जाग आली नाही. आज नगरच्या सिव्हिल हॅास्पिटलच्या आगीत 10 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. फायर ॲाडिट केलंय का? यावर श्वेतपत्रिका जारी करा. राज्यात रूग्णालये मृत्यूचे सापळे बनताहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कामाचंच ॲाडिट करून हकालपट्टी करा", असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राज्यातील सरकारी रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. आयसीयूमध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते, असे सांगण्यात येते. 

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीरया आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. आरोग्य मंत्री म्हणाले, अहमदनगर येथे झालेल्या अग्नितांडवातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून एका आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशअहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगीची घटना मनाला व्यथित करणारी असल्याचे म्हटले आहे. तसेच, या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले, अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :fireआगChitra Waghचित्रा वाघRajesh Topeराजेश टोपेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसhospitalहॉस्पिटल