चिंतन उपाध्यायला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: January 5, 2016 03:13 IST2016-01-05T03:13:46+5:302016-01-05T03:13:46+5:30
कांदीवलीतील दुहेरी हत्याकांडप्रकरणात अटक करण्यात आलेल्या चिंतन उपाध्यायला ११ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून

चिंतन उपाध्यायला न्यायालयीन कोठडी
मुंबई : कांदीवलीतील दुहेरी हत्याकांडप्रकरणात अटक करण्यात आलेल्या चिंतन उपाध्यायला ११ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून नार्को चाचणीसंदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर ८ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.
हेमा उपाध्याय आणि हरिश भांबानी यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी चितंनसह ५ जणांना अटक केली आहे. तथापि, या प्रकरणातील प्रमुख आरोपी विद्याधर राजभर या हत्याकांडाच्या पहिल्या दिवसापासून फरार आहे. चिंतनविरुद्ध पुरेसे पुरावे मिळाले आहेत. तसेच फरार विद्याधर लवकरच हाती लागेल, अशी पोलिसांना आशा आहे. दक्षिण भारतातील एक आर्टिस्टसोबत त्याने शेवटचा कधी संपर्क केला, याचा छडा लावण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलेला असला तरी विद्याधर अजुनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दरम्यान, चिंतन यांच्या वकिलांनी सांगितले की, त्याला विशेष कोठडीत ठेवण्यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला नाही. या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध मिळालेल्या पुराव्यांना बळकटी मिळावी म्हणून आम्ही विद्याधरच्या अटकेची वाट पाहत आहोत. मेमरी कार्ड, आयपॅड असे साहित्य जप्त केले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
\