शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi : मोदी 3.0! नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ...
2
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने! टीम इंडिया तगड्या प्लेइंग इलेव्हनसह भिडणार
3
राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली!
4
PM Modi Oath-Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहांनी नाही, 'या' बड्या नेत्याने घेतली शपथ
5
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : विसराळू रोहित शर्मा! Toss दरम्यान घडला मजेशीर किस्सा अन् पुन्हा पावसाचा मारा, Video 
6
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची घेतली शपथ; 'या' खासदारांना मिळाली संधी
7
चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
8
"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण
9
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
10
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : पाऊस थांबला, खेळपट्टीची पाहणी झाली! सामन्याची वेळ अन् किती षटकांची मॅच तेही ठरलं
11
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
12
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
13
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
14
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
15
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
16
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
17
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
18
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
19
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
20
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा

चिनी मालाची आयात घटली

By admin | Published: October 31, 2016 1:57 AM

यंदाच्या दिवाळीत चिनी मालाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ टक्क्यांनी घटल्याचे कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स यांनी म्हटले आहे.

मुंबई : सोशल मीडियावरून चिनी वस्तूंवर बंदी घालण्याच्या पोस्ट्समुळे यंदाच्या दिवाळीत चिनी मालाची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ टक्क्यांनी घटल्याचे कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स यांनी म्हटले आहे. याउलट, १० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मातीच्या वस्तूंची मागणी अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने देशातील विविध शहराच्या व्यापारी संघटनांच्या बैठकीतून काढलेल्या निष्कर्षात ही माहिती समोर आली आहे. याविषयी, कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील चिनी मालाच्या बहिष्काराच्या शेअरिंगमुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीतील भारत-पाकमधील धुसफूस आणि चीनबद्दलची परिस्थिती सामान्यांपर्यंत पोहोचली आहे. विशेषत: उत्सवाच्या काळात गृहिणी आणि लहान मुले खरेदी करण्यासाठी आघाडीवर असतात. या सर्वांचा उत्सवकाळात खरेदीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल, याच कारणास्तव व्यापाऱ्यांनी चिनी मालावर बहिष्कार घातला आहे. (प्रतिनिधी)