मुंबईचा लोकल पसारा पाहून चिनी अवाक

By Admin | Updated: July 17, 2014 02:29 IST2014-07-17T02:29:03+5:302014-07-17T02:29:03+5:30

४५ लाख प्रवासी आणि त्यांची लोकलमधून होणारी वाहतूक याची माहिती घेतानाच प्रत्यक्षात उपनगरीय लोकल प्रवाशांची वर्दळ पाहणाऱ्या चीनच्या शिष्टमंडळातील २२ जणांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली

The Chinese Awakening of Mumbai's local excursion | मुंबईचा लोकल पसारा पाहून चिनी अवाक

मुंबईचा लोकल पसारा पाहून चिनी अवाक

मुंबई : ४५ लाख प्रवासी आणि त्यांची लोकलमधून होणारी वाहतूक याची माहिती घेतानाच प्रत्यक्षात उपनगरीय लोकल प्रवाशांची वर्दळ पाहणाऱ्या चीनच्या शिष्टमंडळातील २२ जणांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली आणि केवढा हा पसारा, असे म्हणत रेल्वे प्रशासनाची पाठही थोपटली. चीनच्या रेल्वे आणि त्यांच्या अन्य विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबई भेटीवर आले असून, त्यांनी बुधवारी मध्य रेल्वेला भेट दिली.
चीनचे २२ जणांचे शिष्टमंडळ सध्या १३ ते १७ जुलैपर्यंत भारत दौऱ्यावर आले आहे. हे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईत आले होते. या शिष्टमंडळात नॅशनल रेल्वे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे (एनआरए) उप प्रशासकीय अधिकारी झेंग झियान यांच्यासह चीनच्या वाहतूक विभागातील आणि पीपल रिपब्लिक आॅफ चायनाच्या एनआरएमधील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या वेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम होते. दुपारी १२ वाजेपर्यंत शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर त्यांना वर्ल्ड हेरिटेज असलेले आणि मुंबईतील सर्वात महत्त्वाचे वर्दळीचे असे सीएसटी स्थानक दाखवण्यात आले. या स्थानकाची पाहणी करतानाच त्यांनी लोकलमधून उतरणारा आणि स्थानकात येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांचा लोंढा बघितला. हे पाहताच चिनी शिष्टमंडळातील सदस्य अवाक् झाले. (प्रतिनिधी)

Web Title: The Chinese Awakening of Mumbai's local excursion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.