शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार! राहुल कलाटे की नाना काटे आज समजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 07:47 IST

Chinchwad Assembly by-election: चिंचवड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून मंगळवारी सकाळी अर्ज सादर करण्यात येणार आहे, उमेदवार ऐनवेळी जाहिर करू, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले

पिंपरी - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. गेले तीन दिवस राजकीय खलबते सुरू आहेत. ''चिंचवड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असून मंगळवारी सकाळी अर्ज सादर करण्यात येणार आहे, उमेदवार ऐनवेळी जाहिर करू, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सोमवारी रात्री अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे  महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबतची उत्सुकताच ताणली गेली आहे. राहुल कलाटे की नाना काटे हे उमेदवारी दाखल करतानाच समजणार आहे.

विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार जाहीर झालेला नाही. काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे.डिनर डिप्लोमसी ...किवळेमधील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी इच्छुक उमेदवारांचे म्हणणे पवार यांनी ऐकून घेतले. तसेच सर्व नेत्यांबरोबर भोजन घेतले. डिनर डिप्लोमसी केली, मात्र, उमेदवार जाहीर केलं नाही. दरम्यान राहुल कलाटे आणि नाना काटे यांच्या नावावर चर्चा झाली असल्याचे समजते. मात्र, या दोघांपैकी कोणाला संधी देणार हे गुलदस्त्यात आहे.बैठकीनंतर बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, ' महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यात येणार आहे.  सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने उमेदवारी अर्ज सादर करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यात येणार आहे. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीद्वारे निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज भरण्यात येईल.''

टॅग्स :chinchwad-acचिंचवडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस