नाशिक जिल्ह्यात चिमुरड्याची हत्या

By Admin | Updated: June 27, 2017 01:49 IST2017-06-27T01:49:45+5:302017-06-27T01:49:45+5:30

पाच वर्षांच्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे लैंगिक शोषण करुन जिवे ठार मारल्याची घटना येथील इस्लामपुरा परिसरात घडली.

Chimudara murdered in Nashik district | नाशिक जिल्ह्यात चिमुरड्याची हत्या

नाशिक जिल्ह्यात चिमुरड्याची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पाच वर्षांच्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे लैंगिक शोषण करुन जिवे ठार मारल्याची घटना येथील इस्लामपुरा परिसरात घडली. रमजान इदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या अमानुष प्रकारामुळे इस्लामपुरा भागात सोमवारी ईद साजरी झाली नाही.
पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून चार संशयितांना अटक केली आहे. लुकमान गनी पिंजारी हे पत्नी, तीन मुली व मुलासह येथे राहतात. रविवारी रात्री आठ वाजता त्यांचा मुलगा साहिल (५) हा अचानक गायब झाला. तो न सापडल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पिंजारी यांच्या घराजवळच त्यांचा नातेवाईक भिकन पिंजारी राहतो.
रात्री साडेअकराला त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर पलंगावर गोळा केलेल्या गादीत बेशुद्धावस्थेत साहिल आढळला. त्यास सरकारी दवाखान्यात नेले, मात्र डॉक्टरानी त्यास मृत घोषित केले.
रात्री दीड वाजता नागरिकांनी भिकनला शोधून चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. लैंगिक शोषणाच्या हेतूने तोंड दाबून साहिलला जिवे मारल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी भिकन, आमिनाबी, शकीला व नसरीन पिंजारी यांना अटक केली आहे.

Web Title: Chimudara murdered in Nashik district