छमछम बंदच !
By Admin | Updated: September 3, 2014 03:27 IST2014-09-03T03:27:43+5:302014-09-03T03:27:43+5:30
हॉटेल, परिमट रूम तसेच बीअर बारमध्ये कोणत्याही प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालणारा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे.

छमछम बंदच !
नो डान्स : हॉटेल, बारसह पंचतारांकित हॉटेल्समध्येही बंदी, राज्य शासनाचे आदेश
मुंबई : हॉटेल, परिमट रूम तसेच बीअर बारमध्ये कोणत्याही प्रकारचा नृत्याविष्कार आयोजित करण्यावर बंदी घालणारा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यात पंचतारांकित हॉटेल्सचाही समावेश असून, यापूर्वी दिलेले नृत्याविष्काराचे सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.
या ठिकाणी नृत्याविष्कार आयोजित करणा:या, आयोजित करण्याची व्यवस्था करणा:या, आयोजित करण्यास परवानगी देणा:या कोणत्याही व्यक्तीस तीन वर्षार्पयत कारावास आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होईल. नृत्याविष्कार सुरूच असल्याचे आढळल्यास हॉटेल, परमिट रूम किंवा बीअर बारचे परवाने रद्द करण्यात येतील. मात्र त्यापूर्वी आपली बाजू मांडण्याची संधी परवानाधारकाला दिली जाणार आहे.
केवळ बीअर बारच नव्हे तर हॉटेल, परमिट रूमही आता बंदीच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. राज्यात डान्सबारवर बंदी आणली, मात्र पंचतारांकित हॉटेलांमध्ये ते सुरूच असल्याने त्यांना विशेष सूट कशासाठी, असा सवाल केला जात होता. आता पंचतारांकित हॉटेलांमध्ये देखील असे नृत्याविष्कार करता येणार नाहीत. (विशेष प्रतिनिधी)
परवाना रद्द झालेल्या व्यक्तीस संबंधित प्राधिका:याकडे परवाना शुल्क परत मिळण्यास अर्ज करता येईल. प्राधिकारी योग्य ती चौकशी केल्यावर असा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 3क् दिवसांच्या कालावधीत शुल्क परत करेल.