स्विमिंग पूलमध्ये चिमुरडीचा मृत्यू

By Admin | Updated: January 17, 2017 06:09 IST2017-01-17T06:09:22+5:302017-01-17T06:09:22+5:30

माथेरानमधील स्प्रिंगवूड हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका चिमुरडीचा मृत्यू झाला

Chimaridi death in swimming pool | स्विमिंग पूलमध्ये चिमुरडीचा मृत्यू

स्विमिंग पूलमध्ये चिमुरडीचा मृत्यू


माथेरान : माथेरानमधील स्प्रिंगवूड हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका चिमुरडीचा मृत्यू झाला. माथेरान पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लियाकत अली हुसेन हे कुटुंबासह शनिवार, १४ जानेवारी रोजी माथेरान येथे फिरण्यासाठी आले होते. रविवारी दुपारी ३.३० वाजता हॉटेल सोडण्याच्या तयारीत असताना, हादीया लियाकत अली हुसेन ही चार वर्षांची चिमुरडी आपल्या भावाबरोबर खेळत स्विमिंग पुलाच्या दिशेने गेली. निघण्याच्या वेळी कुटुंबाने मुलीचा शोध घेतला असता, ती पुलाच्या दिशेने गेल्याचे तिच्या भावाने सांगितले. कुटुंबाने पुलाकडे धाव घेतली असता, मुलगी मूर्च्छितावस्थेत आढळली. रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chimaridi death in swimming pool