मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांची राज्यपालांसोबत हृदय भेट
By Admin | Updated: February 19, 2016 20:17 IST2016-02-19T20:17:10+5:302016-02-19T20:17:10+5:30
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील जवळ- जवळ २५० मुलांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या निमंत्रणावरून त्यांची राजभवन येथे भेट घेतली.

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांची राज्यपालांसोबत हृदय भेट
>मुंबई, दि. १८ - मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील जवळ- जवळ २५० मुलांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या निमंत्रणावरून त्यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी सर्व मुलांची आपुलकीने विचारपूस केली व त्यांचेशी संवाद साधला. सर्व मुलांनी यावेळी एकत्र ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे गाणे म्हटले.
जानेवारी महिन्यात राज्यपालांनी पुणे भारतीय जैन संघटना या संस्थेला भेट दिली असताना तेथे शिकत असलेल्या सर्व मुलांना राजभवनला येण्याचे निमंत्रण दिले होते त्यानुसार मुलांची आजची राजभवन भेट झाली. राजभवनला भेट देऊन खूप आनंद झाल्याची भावना मुलांनी यावेळी राज्यपालांकडे व्यक्त केली.
यावेळी ‘जय मल्हार’ या मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार देवदत्त नागे व सुरभी हांडे तसेच ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील श्रेया बुगडे हे देखील उपस्थित होते.
शांतीलाल मुथा यांच्या भारतीय जैन संघटनेच्या पुणे येथील संस्थेत ही मुले पाचवी ते बारावी या वर्गात शिक्षण घेत आहेत.