अधिकाऱ्यांची मुले रिंगणात

By Admin | Updated: February 15, 2017 00:47 IST2017-02-15T00:47:17+5:302017-02-15T00:47:17+5:30

महापालिका निवडणुकीत महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही उडी घेतली आहे. यात माजी सहायक आयुक्त, शहर

The children of the officers in the fray | अधिकाऱ्यांची मुले रिंगणात

अधिकाऱ्यांची मुले रिंगणात

मंगेश पांडे / पिंपरी
महापालिका निवडणुकीत महापालिकेतील अधिकारी आणि त्यांच्या मुला-मुलींनीही उडी घेतली आहे. यात माजी सहायक आयुक्त, शहर अभियंता आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या महापालिकेच्या सभागृहात येण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. येथे अनेक वर्षांपासून राजकारण गावकी-भावकी भोवती फिरत होते. मात्र, आता शहरातील उद्योग व्यवसायामुळे राजकारणाचे चित्र बदलताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांबरोबर काही व्यावसायिक मंडळी राजकारणात सहभागी होऊ लागले आहेत. त्यानंतर आता यामध्ये महापालिकेच्या विद्यमान व निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनीही उडी घेतली आहे. महापालिकेतून सहायक आयुक्त पदावरून तीन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले सुभाष माछरे हे काँगे्रसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, तर निवृत्त शहर अभियंता एम. टी. कांबळे यांची कन्या अश्विनी कांबळे या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांचे चिंरजीव आशिष रॉय हेदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत.

Web Title: The children of the officers in the fray