मुलावर सामूहिक अत्याचार करणारे अटकेत
By Admin | Updated: July 22, 2014 01:57 IST2014-07-22T01:57:09+5:302014-07-22T01:57:09+5:30
जेवणाची पार्टी देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाला दारू पाजून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार करण्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मुलावर सामूहिक अत्याचार करणारे अटकेत
मुंबई : जेवणाची पार्टी देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाला दारू पाजून त्याच्यावर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार करण्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
चेंबूरच्या अमरमहल परिसरात हा 14वर्षीय सागर (नाव बदलले आहे) कुटुंबासोबत राहतो. 13 जुलैला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तो घराबाहेर असताना तिन्ही आरोपींनी त्याला पार्टी देतो असे सांगून एका निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी मुलाला शीतपेयातून दारू पाजली. याचदरम्यान आरोपींनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपींनी मुलाला दिली.
भीतीपोटी मुलाने त्या वेळी ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र रविवार्री सायंकाळी त्याने घडलेला प्रकार आईला सांगितला.
तिने तत्काळ टिळकनगर पोलीस ठाणो गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींना काल रात्री अटक केली असून, त्यांना आज
न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 जुलैर्पयत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)