मुलाने केला बापाचा खून

By Admin | Updated: March 6, 2017 23:14 IST2017-03-06T23:14:29+5:302017-03-06T23:14:29+5:30

यात्रेला जाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना खापर (ता. अक्कलकुवा) येथील कोराई भागातील भाट्याफळी येथे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़

The child had the father's blood | मुलाने केला बापाचा खून

मुलाने केला बापाचा खून

ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 6  : यात्रेला जाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना खापर (ता. अक्कलकुवा) येथील कोराई भागातील भाट्याफळी येथे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़

रविवारपासून खापर येथे वार्षिक यात्रोत्सव सुरू आहे़ यात सहभागी होण्यासाठी भाट्याफळी भागातील रहिवासी योगेश रवींद्र पाडवी याने वडील रवींद्र भरत पाडवी (५२) यांच्याकडून पैसे मागितले़ रवींद्र त्याला यांनी पैसे दिले नाहीत़ याचा राग आल्याने योगेश पाडवी याने घरातील लाकडी मुसळ रवींद्रच्या डोक्यात मारला़ मुसळच्या प्रहारामुळे रवींद्र हे घटनास्थळीच गतप्राण झाले़ परिसरातील नागरिकांनी खापर औटपोस्टला ही माहिती दिल्यानंतर संशयित आरोपी योगेश यास ताब्यात घेण्यात आले़

योगेश याचा लहान भाऊ किसन पाडवी याने दिलेल्या फिर्यादीवरून योगेश याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे़

Web Title: The child had the father's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.