टँकमध्ये बुडून बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 21, 2016 21:32 IST2016-08-21T21:32:22+5:302016-08-21T21:32:22+5:30
शहरातील बावनखोली भागातील टँकमध्ये बुडून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

टँकमध्ये बुडून बालकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 21 - शहरातील बावनखोली भागातील टँकमध्ये बुडून बालकाचा मृत्यू झाल्याची घटना २१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
बावनखोली येथील कार्तिक शिवाजी धुमाळ (७) बालक २० आॅगस्ट रोजी घराबाहेर पडला होता. परंतु तो उशिरापर्यंत घरी परतलाच नसल्याने नातेवाईकांनी तो हरवला असल्याबाबत शहर पोलिसांत तक्रार दिली. रविवारी सायंकाळच्या सुमारास टँकमध्ये कोणीतरी पडल्याचे आढळून आले. त्यानंतर नागरिकांनी धाव घेऊन बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह हरवलेल्या कार्तिकचाचा असल्याची ओळख पटली. याप्रकरणी शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात आल्याची माहिती शहर ठाण्याचे पोनि जगदीश भंडरवार यांनी दिली.