पूर्णा नदीत बुडून बालिकेचा मृत्यू

By Admin | Updated: September 7, 2016 19:39 IST2016-09-07T19:39:35+5:302016-09-07T19:39:35+5:30

सेनगाव तालुक्यातील उटीपूर्णा येथील इयत्ता ८ वीमध्ये शिकत असलेली मुलगी सोनाली माधव भिसे (१०) हिचा पूर्णा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.

Child dies drowning in Purna river | पूर्णा नदीत बुडून बालिकेचा मृत्यू

पूर्णा नदीत बुडून बालिकेचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
कापडसिंगी, दि. 7 - सेनगाव तालुक्यातील उटीपूर्णा येथील इयत्ता ८ वीमध्ये शिकत असलेली मुलगी सोनाली माधव भिसे (१०) हिचा पूर्णा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.
उटीपूर्णा येथील सोनाली माधव भिसे व तिची बहीण शुभांगी माधव भिसे (१४) या सकाळी ९ वाजता पूर्णा नदीपात्रात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. सोनालीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. याची माहिती तात्काळ तिच्या बहिणीने गावात येवून लोकांना दिली. मात्र तोपर्यंत सोनालीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधाशोध करून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर सेनगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. कापडसिंगी प्रा.आ. केंद्रात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी घटनास्थळी पोलिस उपस्थित होते.

Web Title: Child dies drowning in Purna river