दिवाळीच्या कपड्यांसाठी शाळकरी मुलाची आत्महत्या

By Admin | Updated: November 10, 2015 02:47 IST2015-11-10T02:47:56+5:302015-11-10T02:47:56+5:30

दिवाळीसाठी वेळेवर कपडे न घेतल्याचा राग मनात धरून एका शाळकरी मुलाने थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला

Child child suicides due to Diwali cloth | दिवाळीच्या कपड्यांसाठी शाळकरी मुलाची आत्महत्या

दिवाळीच्या कपड्यांसाठी शाळकरी मुलाची आत्महत्या

सातारा : दिवाळीसाठी वेळेवर कपडे न घेतल्याचा राग मनात धरून एका शाळकरी मुलाने थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला. रागाच्या भरात १४ वर्षांच्या शाळकरी मुलाने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
प्रणीत महाडिक (१४, निनाम पाडळी, ता. जि़सातारा) नववीत शिकत होता. दिवाळीसाठी त्याला कपडे घ्यायचे होते. मात्र आईने रविवारी ‘उद्या कपडे घेऊ’, असे सांगितल्याच्या रागातून त्याने रविवारी संध्याकाळी घरातील पंख्याला दोरीने गळफास घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Child child suicides due to Diwali cloth