अल्पवयीन मुलाचा बालिकेवर अत्याचार
By Admin | Updated: March 6, 2017 00:44 IST2017-03-06T00:44:18+5:302017-03-06T00:44:18+5:30
साडेतीन वर्षांच्या मुलीला स्वच्छतागृहात नेऊन अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अल्पवयीन मुलाचा बालिकेवर अत्याचार
पिंपरी : दुकानातून चॉकलेट घेऊन घरी जात असताना, साडेतीन वर्षांच्या मुलीला स्वच्छतागृहात नेऊन अल्पवयीन मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास रुपीनगरमध्ये घडली.
याबाबत पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा निगडी परिसरात कामाला असून, तो चिखलीत घरकुलमध्ये राहतो. पीडित मुलगी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेली होती. ती दुकानातून परतत असताना आरोपीने दुचाकीवरून येऊन तिला स्वच्छतागृहात नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. (प्रतिनिधी)