अल्पवयीन मुलाने केला बालकावर लैंगिक अत्याचार!

By Admin | Updated: April 1, 2016 00:55 IST2016-04-01T00:55:51+5:302016-04-01T00:55:51+5:30

अकोला येथील घटना; बालक रुग्णालयात भरती, आरोपीस पोलिसांनी केली अटक.

Child abuse child abuse child! | अल्पवयीन मुलाने केला बालकावर लैंगिक अत्याचार!

अल्पवयीन मुलाने केला बालकावर लैंगिक अत्याचार!

अकोला: मोबाइल, इंटरनेटचा चांगला उपयोग करण्याऐवजी त्याचा दुरुपयोगच अधिक होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. मोबाइल, व्हाट्सअँपवर अश्लील संदेश, चित्रफिती यामुळे कोवळय़ा वयातील मुलांवरही दुष्परिणाम होत आहेत. असाच प्रकार गुरुवारी घडला. १४ वर्षीय मुलाने घराजवळ राहणार्‍या सहा वर्षीय बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडित मुलाला सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसो बढे येथे एका १४ वर्षीय विधिसंघर्ष मुलाने शेजारी राहणार्‍या सहा वर्षीय मुलाला अज्ञात स्थळी नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलाने त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. कुटुंबातील लोक यामुळे संतप्त झाले. त्यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाणे गाठून अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर भादंविच्या कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. पीडित मुलाची प्रकृती बिघडल्याने, त्याला पोलिसांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Child abuse child abuse child!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.