चिकनगुनिया, डेंग्यूची साथ

By Admin | Updated: October 8, 2016 04:38 IST2016-10-08T04:38:06+5:302016-10-08T04:38:06+5:30

राज्यभरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे

Chikungunya, with dengue | चिकनगुनिया, डेंग्यूची साथ

चिकनगुनिया, डेंग्यूची साथ


मुंबई : राज्यभरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूमुळे राज्यात ६ जणांचा मृत्यू ओढावला आहे. कोल्हापूर, कल्याण -डोंबिवली आणि मुंबई पालिका क्षेत्रात प्रत्येकी दोघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे ६९३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६४० आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४०८ रुग्ण आढळून आले आहेत. तर कोल्हापूरमध्ये २५३, नाशिक ग्रामीणमध्ये १९४ आणि पुणे ग्रामीणमध्ये १३० रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात चिकनगुनियाची साथ पसरली आहे. राज्यात अन्य ठिकाणी चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. सप्टेंबर महिन्यात चिकनगुनियाचे ९७५ रुग्ण आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Chikungunya, with dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.