चिक्की घोटाळा ; आरोपामागे गुजराती लॉबी

By Admin | Updated: June 29, 2015 01:46 IST2015-06-29T01:46:03+5:302015-06-29T01:46:03+5:30

संपूर्ण राज्यात चिक्की घोटाळ्यावरून रान पेटले असतानाच सरकारला चिक्की पुरवणाऱ्या सूर्यकांता महिला सहकारी संस्थेने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

Chikki scam; Gujarati lobby behind the accused | चिक्की घोटाळा ; आरोपामागे गुजराती लॉबी

चिक्की घोटाळा ; आरोपामागे गुजराती लॉबी

वेंगुर्ले (जि. रत्नागिरी) : संपूर्ण राज्यात चिक्की घोटाळ्यावरून रान पेटले असतानाच सरकारला चिक्की पुरवणाऱ्या सूर्यकांता महिला सहकारी संस्थेने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. यामागे गुजराती उद्योगपतीची लॉबी काम करीत असून, आरोपामागे त्यांचाच हात असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ््याचा आरोप होत आहे. सूर्यकांता महिला सहकारी संस्थेला मिळालेल्या ८० कोटी रुपयांची चिक्की पुरविण्याच्या ठेक्यावरून ही संस्था देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर वेतोर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सूर्यकांता महिला सहकारी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे यांनी हा दावा केला. सन २००५मध्ये स्थापन झालेली सूर्यकांता महिला सहकारी संस्था २००८मध्ये रजिस्टर करून २०१०मध्ये तिचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर २०११मध्ये चिक्की बनविण्यास मान्यता मिळाली. २०१३मध्ये चिक्की पुरवण्याची पहिली आॅर्डर मिळाली. आमची संस्था एकमेव खासगी सहकारी संस्था असून, सध्या वेतोरे येथील युनिटकडून २०० टन चिक्कीचे उत्पादन सुरू असल्याची माहिती गावडे यांनी दिली.
आम्हाला मिळालेली आॅर्डर ८० कोटींची नसून, ती ७४ कोटींची होती. त्यामध्ये ५२ कोटी मायक्रो न्युट्रियन्ट व २२ कोटी राजगिरा चिक्कीची आॅर्डर होती. चिकीसाठी लागणारा शेंगदाणा, गूळ आदी उच्च दर्जाचे वापरत आहोत. २०१३ मध्ये झालेली राजकीय तक्रार वगळता एकही तक्रार आमच्या चिक्की उत्पादनाबाबत नाही, असे गावडे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Chikki scam; Gujarati lobby behind the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.