शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : विदर्भातूनच जाणार मुख्यमंत्रिपदाचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:47 IST

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विदर्भाने टाकली कात : वाढलेली सिंचन क्षमता जमेची बाजू

नागपूर : भाजप-सेना महायुतीकडून ‘अब की बार, २२० के पार’ असा नारा लावण्यात येतो आहे. हा आकडा गाठण्यात विदर्भातील जागांचा सर्वात मोठा वाटा राहणार आहे. यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या गृहप्रदेशात महायुतीने जोर लावला असून, विविध राष्ट्रीय नेत्यांच्या सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घालण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत युती सरकारच्या नेतृत्त्वात विदर्भाच्या विकासाच्या गाडीने वेग घेतला आहे. त्यामुळे या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर भर देण्यात येत आहे.

२०१४ नंतर केंद्रात ‘नरेंद्र’ व राज्यात ‘देवेंद्र’ असे चित्र निर्माण झाले. कधी नव्हे ते विदर्भाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद झाली व अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीलादेखील सुरुवात झाली. विशेषत: कृषी व सिंचनाशी संबंधित प्रकल्पांवर मागील पाच वर्षांत जास्त जोर देण्यात आला. त्यामुळे विदर्भात प्रचारादरम्यान या योजनांची माहिती मतदारांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचविण्यात येत आहे. २०१४ साली विदर्भाचा सिंचन अनुशेष हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता. मागील पाच वर्षांत ५० हजार हेक्टरहून अधिकचा सिंचन अनुशेष दूर झाला आहे. शिवाय मागील पाच वर्षांत विदर्भाची सिंचन क्षमता १३ लाख हेक्टरहून अधिकपर्यंत नेण्यात यश आले आहे. सरकारच्या विविध योजनांमुळे कृषिपंपांचा अनुशेषदेखील ५० टक्क्यांवर आणल्या गेला आहे. दुसरीकडे विदर्भात पायाभूत सुविधांचा विकासदेखील मोठ्या प्रमाणात झाला. राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे जाळेविस्तारले आहे. या बाबी घेऊनच भाजपचे कार्यकर्ते ग्रामीण भागात मतदारांपर्यंत जात आहेत.

राजकीय अनुशेषदेखील दूर२०१४ च्या अगोदर विदर्भाच्या वाट्याला राजकीय पातळीवर फारशी महत्त्वाची पदे आली नाहीत. परंतु मागील पाच वर्षांत विदर्भातून मुख्यमंत्री, वित्तमंत्री व ऊर्जामंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री व राज्यमंत्री झाले. याअगोदर असा राजकीय संयोग कधीच पाहायला मिळाला नव्हता. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील भाजपने वरचष्मा निर्माण केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत बदललेली राजकीय परिस्थिती भाजप-सेनेसाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.शहरी भागांसाठी पायाभूत सुविधांचे मुद्देभाजप-सेना महायुतीतर्फे विदर्भातील शहरी भागात प्रचारादरम्यान पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात तर ‘मेट्रो’ पाच वर्षांत धावायला लागली आहेच. शिवाय येथे राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थादेखील मोठ्या प्रमाणात आल्या. मिहानमध्ये पतंजली, रिलायन्स व दसॉचा संयुक्त प्रकल्प सुरू झाला. अमरावतीत वस्त्रोद्योग पार्कमध्ये तीन उद्योग सुरू झाले. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘आयटी’ कंपन्यादेखील आल्या आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामालादेखील सुुरुवात झाली आहे. या महामार्गामुळे विदर्भ ‘लॉजिस्टिक’च्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून समोर येणार आहे, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. या बाबी घेऊन भाजप-सेना महायुतीचे कार्यकर्ते शहरी भागातील मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ