कॅम्पाकोलाप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका

By Admin | Updated: June 10, 2014 01:11 IST2014-06-09T23:05:12+5:302014-06-10T01:11:23+5:30

कायद्याच्या चौकटीत बसेल अशा कोणताही प्रस्ताव किंवा पर्यायावर विचार करण्याची आपली अजुनही तयारी आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे.

Chief Minister's role in Campacola | कॅम्पाकोलाप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका

कॅम्पाकोलाप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका

कायद्याच्या चौकटीतील कोणत्याही प्रस्तावाचा विचार करण्याची तयारी
कॅम्पाकोलाप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका
मुंबई : कॅम्पाकोलाप्रकरणी घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत बसेल अशा कोणताही प्रस्ताव किंवा पर्यायावर विचार करण्याची आपली अजुनही तयारी आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केली आहे.
कॅम्पाकोलाबाबत आपली भूमिका मांडताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, कॅम्पाकोला सोसायटीने दाखल केलेली विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१३ मध्ये फेटाळली व महानगरपालिकेने अनधिकृत मजल्यांवर त्वरीत कार्यवाही करावी, असे आदेश दिले. तसेच कोणत्याही प्राधिकार्‍याने त्यात हस्तक्षेप करु नये, असेही आदेश दिले.
त्यानंतर रहिवाशांनी विनंती याचिका दाखल करुनही न्यायालयाने फेब्रुवारी २०१३ च्या निणर्यात बदल करण्यास नकार दिला. फक्त सदनिका रिकाम्या करण्याची मुदत वाढवुन दिली. यासाठीची शेवटची मुदत ३१ मे २०१४ रोजी संपली आहे. मुदतवाढीची विनंती करणारी याचिकाही ३ जून २०१४ रोजी न्यायालयाने फेटाळली.
या परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत बसेल, असा कोणताही पर्याय सध्या दिसत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निणर्यास बाधा येणार नाही, असा एखादा प्रस्ताव समोर आल्यास त्यावर चर्चा, विचार करण्याची आपली अद्यापही तयारी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister's role in Campacola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.