पंकजा मुंडेंच्या नाराजीला मुख्यमंत्र्यांचे टिवटरवरुन उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 08:17 IST2016-07-10T07:38:42+5:302016-07-10T08:17:32+5:30

रात्री जाहीर झालेल्या खातेवाटपामध्ये जलसंधारण आणि रोजगार हमी अशी दोन महत्वाची खाती काढून घेतल्याने पंकजा मुंडे नाराज झाल्या आहेत.

Chief Minister's reply to Pankaja Munde's resignation | पंकजा मुंडेंच्या नाराजीला मुख्यमंत्र्यांचे टिवटरवरुन उत्तर

पंकजा मुंडेंच्या नाराजीला मुख्यमंत्र्यांचे टिवटरवरुन उत्तर

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - खातेवाटपामध्ये जलसंधारण आणि रोजगार हमी  ही दोन महत्वाची खाती काढून घेतल्याची नाराजी पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे टि्वटरवरुन व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही लगेचच टि्वटरवरुन उत्तर दिले आहे. 
 
सिंगापूरमध्ये होणा-या वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण मिळाले होते. पण आता मी त्या खात्याची मंत्री राहिली नसल्याने उपस्थित राहू शकणार नाही असे टि्वट पंकजा मुंडेंनी केले होते. 
 
या टि्वटची माहिती मिळताच रशिया दौ-यावर निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी विमानातूनच पंकजा मुंडे यांनी वरिष्ठमंत्री या नात्याने  सरकारच्या प्रतिनिधी म्हणून वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहीले पाहिजे असे म्हटले आहे. 
 
आणखी वाचा 
 
फडणवीस सरकारची ‘फ्लॅगशिप स्कीम’ म्हणून जलयुक्त शिवार योजनेची व्यापक प्रसिद्धी केली गेली होती. मात्र जलसंधारणाची कामे आपणच केली असे विधान मुंडे यांनी केले होते. त्याचा फटका त्यांना बसला आहे. त्यांचे हे खाते बढती देण्यात आलेल्या राम शिंदे यांना मिळाले आहे. 
 

Web Title: Chief Minister's reply to Pankaja Munde's resignation