माणिकरावांना मुख्यमंत्र्यांची नोटीस

By Admin | Updated: February 27, 2016 02:25 IST2016-02-27T02:25:15+5:302016-02-27T02:25:15+5:30

आपल्यावरील आरोपांसंदर्भात १५ दिवसांच्या आत माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करावा लागेल, अशी नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश काँग्रेसचे

Chief Minister's notice to Manikrawa | माणिकरावांना मुख्यमंत्र्यांची नोटीस

माणिकरावांना मुख्यमंत्र्यांची नोटीस

मुंबई : आपल्यावरील आरोपांसंदर्भात १५ दिवसांच्या आत माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करावा लागेल, अशी नोटीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठविली आहे. झोपु प्राधिकरणाने त्यांचे व्यवहार अ‍ॅक्सिस बँकेमार्फतच करावेत, अशी सक्ती मुख्यमंत्र्यांनी केली असून या बँकेत फडणवीस यांच्या पत्नी अधिकारी असल्याने ही सक्ती केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister's notice to Manikrawa