मुख्यमंत्र्यांचे जातिवाचक विधान चुकीचे - जयंत पाटील

By Admin | Updated: October 26, 2016 01:48 IST2016-10-26T01:48:55+5:302016-10-26T01:48:55+5:30

केवळ ब्राह्मण असल्याने मला मुख्यमंत्रीपदावरून कोणी काढणार नाही, असे जातिवाचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना कधीही कोणी जातीवाचक बोलले नाही.

The Chief Minister's misconception is wrong - Jayant Patil | मुख्यमंत्र्यांचे जातिवाचक विधान चुकीचे - जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांचे जातिवाचक विधान चुकीचे - जयंत पाटील

सांगली : केवळ ब्राह्मण असल्याने मला मुख्यमंत्रीपदावरून कोणी काढणार नाही, असे जातिवाचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांना कधीही कोणी जातीवाचक बोलले नाही. तरीही ते असे का बोलत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध जाती, धर्मांचे मोर्चे निघत असल्याने सोशल इंजिनिअरिंग कसे करायचे, याबाबत त्यांचा गोंधळ झालेला दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
मंत्रिमंडळातील सहकारी, घटक पक्षांचे नेते तसेच विरोधक म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मुख्यमंत्री कुंडल्या काढण्याचा दम देत आहेत. शत्रू कोण आहे, हेच त्यांना कळेना झाले आहे. सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली असताना, अशाप्रकारची दमाची भाषा योग्य नाही. कुंडल्या काढण्याचा इशारा देत कारभार करण्यापेक्षा गोडीगुलाबीने राज्य त्यांनी चालवावे, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister's misconception is wrong - Jayant Patil