शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 21:28 IST

Uddhav Thackeray : कोल्हापूर, सांगलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे

मुंबई : जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या म्हणजेच दिनांक 02 ऑगस्ट 2021 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे 2019 पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. 

कोल्हापूर, सांगलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच, येथील स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. 

उद्धव ठाकरेंचा सांगली दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे... दिनांक 02 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.40 वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रुझकडे प्रयाण. सकाळी 8.55 वा. छ.शि.म.आं.विमानतळ सांताक्रुझ येथे आगमन. सकाळी 9 वा. विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.55 वा. मोटारीने भिलवडी ता-पलूस, जिल्हा - सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. सकाळी 11.05 वा.  मोटारीने अंकलखोप, ता-पलूसकडे प्रयाण. सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. 

सकाळी 11.20 वा. मोटारीने कसबे डिग्रज, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण, 11.55 वा. कसबे डिग्रज जिल्हा - सांगली येथे आगमन  व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.05 वा. मोटारीने मौजे डिग्रज, जिल्हा –सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.20 वा. मोटारीने आयर्विन पुल, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.40 वा. मोटारीने हरभट रोड, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 

दुपारी 12.55 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. दुपारी 1.45 वा. मोटारीने भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेजकडे प्रयाण. दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन, दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSangliसांगलीSangli Floodसांगली पूरfloodपूर