सध्या राज्यात झपाट्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार) कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात जाऊन लसीचा पहिला डोस घेतला होता. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यावेळी त्यांनी जे पात्र आहेत अशा लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं.
Corona Vaccination : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 12:26 IST
Corona Vaccination : ११ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतला पहिला डोस
Corona Vaccination : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
ठळक मुद्दे११ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतला पहिला डोसयापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतला होता दुसरा डोस