मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा, विषय कर्जमाफीचा; पण राष्ट्रपतिपदासाठी मते मागितली?
By Admin | Updated: June 24, 2017 02:46 IST2017-06-24T02:46:23+5:302017-06-24T02:46:23+5:30
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा, विषय कर्जमाफीचा; पण राष्ट्रपतिपदासाठी मते मागितली?
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रामनाथ कोविंद यांना मदत करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे.
फडणवीस व पाटील हे पवार यांना भेटायला गेले, तेव्हा तिथे सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे हेही होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आपण नंतर भेटणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस व पवार यांच्यात बंद खोलीत कोविंद यांना राष्ट्रवादीची मते मिळावीत यासाठी चर्चा झाल्याचे कळते. राष्ट्रपती-पदाच्या निवडणुकीत व्हिप काढला जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची मते कोविंद यांच्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.