ईस्ट-वेस्ट सेंटरशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

By Admin | Updated: September 26, 2015 03:02 IST2015-09-26T03:02:13+5:302015-09-26T03:02:13+5:30

ईस्ट-वेस्ट सेंटरच्या माध्यमातून आशिया आणि अमेरिका खंडातील १४ निवडक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

Chief Minister talk about East-West Center | ईस्ट-वेस्ट सेंटरशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

ईस्ट-वेस्ट सेंटरशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई : ईस्ट-वेस्ट सेंटरच्या माध्यमातून आशिया आणि अमेरिका खंडातील १४ निवडक प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई तसेच महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. याचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी स्वत: मुख्यमंत्री या संस्थेच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी अमेरिकेला अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे ही भेट ईस्ट-वेस्ट सेंटरच्या शिष्टमंडळासाठी एक आनंददायी अनुभव ठरली. २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच हे शिष्टमंडळ भारतात आले असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन औद्योगिक वाटचाल, विदेशी गुंतवणूक, सामाजिक न्याय, रोजगारनिर्मिती आदी विषयांवर राज्याची प्रगती समजून घेतली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister talk about East-West Center