शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकूण एक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासणार; ‘सगेसोयरे’वर जरांगे ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 08:33 IST

मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आ. बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

मुंबई/जालना : मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रत्येक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. हैदराबाद, तेलंगणातील कागदपत्रांची तपासणीही केली जाणार आहे. क्युरेटिव पिटीशनवर २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार असून, मराठ्यांना आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना दिली. तर सगेसोयरे शब्दाचा समावेश करून आरक्षणाचा जीआर काढा, २० जानेवारीपर्यंत आरक्षण दिले तर  आम्हाला मुंबईला येण्याची गरज नाही, असे म्हणत जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आ. बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शिवाय प्रत्येक अधिकाऱ्यांनी समितीला सहकार्य करावे, नोंदी शोधाव्यात याबाबत सक्त सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

‘त्या’ शब्दांचा समावेश जीआरमध्ये करा : जरांगे  - जरांगे पाटील म्हणाले, उपोषण सोडताना जे शब्द सांगितले होते त्या चारही शब्दांचा जीआरमध्ये समावेश करावा. ज्याची नोंद - सापडेल त्याचा पूर्ण परिवार, ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक, ज्याची नोंद सापडले - त्याचे सगेसोयरे, मागेल त्याला आरक्षण द्यायचे हे शब्द टाकून आरक्षणाचा जीआर काढावा. 

मराठा समाजाचे सर्वेक्षण एक-दोन दिवसांत -मराठा समाजाचे मागासलेपण ठरविण्यासाठीचे निकष निश्चित केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने घरोघरी सर्वेक्षणासाठी तयारी केली आहे. सर्वेक्षणासाठी तालुका तसेच महापालिका व नगरपालिका स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होत आहे. 

जरांगे, अंतरवालीच्या एकाचीही नोंद नाही मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याची कुणबी नोंद सापडली नसल्याचे समोर आले आहे. ज्या अंतरवाली सराटी गावात आंदोलन सुरू आहे, त्या गावातील एकाचीही कुणबी नोंद सापडलेली नाही.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणreservationआरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील