मुख्यमंत्री शांत, सुप्रिया सुळे यांचाच थयथयाट

By Admin | Updated: October 6, 2016 15:08 IST2016-10-06T15:08:35+5:302016-10-06T15:08:35+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध एकेरी शब्द प्रयोग केल्याचा आरोप करीत नाशिक भाजपच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात निदर्शने केली.

Chief Minister Shanti, Supriya Sule is also of the Thayathaya | मुख्यमंत्री शांत, सुप्रिया सुळे यांचाच थयथयाट

मुख्यमंत्री शांत, सुप्रिया सुळे यांचाच थयथयाट

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ६ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध एकेरी शब्द प्रयोग केल्याचा आरोप करीत नाशिक भाजपच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यलया सामोर निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शांत वृत्तीचे असून सुप्रिया सुळे या हातातून सत्ता गेल्यानेच थयथयाट करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सुप्रिया सुळे बुधवारी नाशिक दौऱ्यावर होत्या नाशिक आणि सटाणा येथे बोलतांना सुळे यांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना एकेरी उल्लेख केला असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर ही निदर्शने करण्यात आली. दरम्यान यावेळी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागीतलीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.  सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करतांना त्या नळावर महिला वाद करतात तसे भांडण करतात अशी टीका केली होती. महिला भांडखोर असतात असे सुळे यांचे म्हणणे आहे हा देखील महिलांचा अपमान असून सुळे यांनी त्याबद्दल महिलांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

Web Title: Chief Minister Shanti, Supriya Sule is also of the Thayathaya