अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
By Admin | Updated: March 14, 2016 14:18 IST2016-03-14T12:59:28+5:302016-03-14T14:18:44+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केली

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
>
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि.. १४ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्मारकासाठी कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे यासंबंधी संपूर्ण माहिती घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरदेखील उपस्थित होते. अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भुमीपजून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भुमीपूजन भव्य करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे.