मुख्यमंत्र्यांनी केली तावडेंची पाठराखण
By Admin | Updated: June 24, 2015 01:48 IST2015-06-24T01:48:03+5:302015-06-24T01:48:03+5:30
बोगस पदवीमुळे अडचणीत सापडलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली.

मुख्यमंत्र्यांनी केली तावडेंची पाठराखण
मुंबई : बोगस पदवीमुळे अडचणीत सापडलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. तावडे यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी केलेली मागणी त्यांनी फेटाळून लावली.
ज्ञानेश्वर विद्यापीठ या अनधिकृत विद्यापीठाची पदवी संपादन केल्यामुळे शिक्षणमंत्री तावडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून, तावडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने आज राज्यव्यापी आंदोलन करत तावडेंच्या बोगस पदवीचे ठिकठिकाणी दहन केले.
मुख्यमं^त्र्यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावतानाच ज्ञानेश्वर विद्यापीठाची भलामण केली. ते म्हणाले, रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देणाऱ्या संस्थांची आजच्या परिस्थितीत अधिक गरज आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या संस्थांची उभारणी झाली पाहिजे. (विशेष प्रतिनिधी)