शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुख्यमंत्र्यांनी काढली शिवसेनेची औकाद

By admin | Updated: January 28, 2017 20:01 IST

तुमची औकात काय हे येत्या २१ तारखेला दाखवून देऊ अशासा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - 'भाजपाची औकात काय आणि तुमची औकात काय हे येत्या २१ तारखेला दाखवून देऊ ' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. भारतीय जनतेच्या पक्षाच्या  विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. आमची शिवसेनेच्या विचारांशी नव्हे तर त्यांच्या आचारांसी लढाई आहे. त्यांचे विचार वेगळे आणि आचार भलतेच असतात.  त्यांचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 
 
भाषणादरम्यान बसला मुख्यमंत्र्यांचा आवाज
पारदर्शी कारभारचा दाखला देत शिवेसेनवर जोशात टीकास्त्र सोडणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आवाज अचानक बसला. मात्र त्यावरही ' आज पाणी पितोय, २१ तारखेला पाणी पाजेन' असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. मात्र आवाजाने जास्त वेळ साथ न दिल्याने त्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. 
 
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वपूर्ण मुद्दे : 
 
 
- आम्ही मनोरंजन करणारे, जुगलबंदी करणारे लोक नाही. आम्ही नोटाबंदी करणारे, भ्रष्टाचारबंदी करणारे लोक आहोत.
 
- शिवसेनेच्या हट्टामुळे युती तुटली.
 
- भाजपाला १२७, शिवसेनेला १४७ आणि इतरांसाठी १८ जागा देण्याचा निर्णय झाला होचा. मात्र शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळेच ही युती तुटली.
 
- विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो .
 
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून भाजपची ताकद दिसली, पण तरीही मनपा युतीसाठी माघार घेतली.
 
- शिवसेनेच्या आचारात आणि विचारात फरक. त्यांचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही. 
 
- युतीसाठी पारदर्शीपणा ही एकच अट ठेवली, पारदर्शीपणा ही माझी चूक आहे का?
 
- सत्तेत येऊन हाती भगवा घेऊन खंडणी वसुली करणं हे कदापी खपवून घेणार नाही.
 
- भगवा झेंडा घेऊन हफ्ता वसुली करण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही.
 
- तुम्ही सांगाल तेवढा पारदर्शीपणा राज्य सरकारमध्ये आणायची माझी तयारी आहे. 
 
- प्रश्न जागांचा नव्हता, ५-६ जागा इकडे-तिकडे झाल्या तरी चालतील. पण पारदर्शिकतेच्या मुद्यावर तडजोड करणार नाही. 
 
- भाजपची औकात काय आणि तुमची औकात काय हे आम्ही २१ तारखेला दाखवून देऊ. 
 
- 25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान झालं.
 
- आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचं आहे.
 
- जनतेला अफूची गोळी देणं बंद केलं पाहिजे. जनेतेन म्हटलं पाहिजे '(तुम्ही) करून दाखवलं.'