मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा
By Admin | Updated: September 26, 2014 18:51 IST2014-09-26T18:51:29+5:302014-09-26T18:51:49+5:30
सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आल्यामुळे नैतिक मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आल्यामुळे नैतिक मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने करीत सरकारमधून बाहेर पडण्याचा तडकाफडकी निर्णय काल घेतला होता. शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर लगेच एका पत्रकार परिषदेमधून काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने काँग्रेसवर आरोप करीत आपली १५ वर्षापासूनची आघाडी संपुष्टात आणली. राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात सरकार आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांकडे केली होती.