मुख्यमंत्री होणो माङो स्वप्न नाही

By Admin | Updated: August 23, 2014 00:08 IST2014-08-23T00:08:10+5:302014-08-23T00:08:10+5:30

मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही; मात्र मुख्यमंत्री कसा असतो, हे मी दोन महिन्यांनंतर दाखवितो, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

The Chief Minister is not a dream | मुख्यमंत्री होणो माङो स्वप्न नाही

मुख्यमंत्री होणो माङो स्वप्न नाही

उद्धव यांचे प्रतिपादन 
पाटण : मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही; मात्र मुख्यमंत्री कसा असतो, हे मी दोन महिन्यांनंतर दाखवितो, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
मरळी (ता.पाटण) येथील सभेत  ते बोलत होते. ते म्हणाले, घराघरात पोलीस दिले तरी महिला सुरक्षित राहू शकत नाहीत, असे विधान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले होते. आपल्याच पोलिसांविषयी अविश्वास दाखवणारा गृहमंत्री आजवर कधी पाहिला नव्हता. तर दुसरीकडे राज्यात महिला सुरक्षित असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केला जात आहे. आघाडी शासनाच्या मंत्र्यांनी पोलीस बंदोबस्ताशिवाय पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात फिरून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. 5क् वर्षाच्या काळात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसांवर अत्याचार केला आहे. सीमाप्रश्न म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. सीमाभागातील कोवळी मुले मला कोल्हापूरमध्ये भेटली होती. आम्हाला मराठी बोलू दिले जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. तेव्हा मी त्यांना सांगितले की, दोन महिने थांबा, मराठी मुख्यमंत्री कसा असतो, हे दाखवीन, असे त्यांनी सांगितले. या वेळी आमदार दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार शंभुराजे देसाई उपस्थित होते. 
लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मी लहानपणी पाहिल्याचे आठवते. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला सांगायचे, की मंत्री असावा तर बाळासाहेब देसाईंसारखा करारी. बोलतो ते करणारच. त्यांची प्रशासनावर जरब होती, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाषणात आठवणींना उजाळा दिला. 
 
बाबर यांचा सेनाप्रवेश
विटा येथील जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे माजी आ. अनिल बाबर यांच्या हातात शिवबंधन बांधून व भगवा ध्वज हातात देऊन शिवसेनेत प्रवेश दिला.

 

Web Title: The Chief Minister is not a dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.