मुख्यमंत्रीसाहेब, आपल्या वाचाळ मंत्र्यांना आवरा - अजित पवार
By Admin | Updated: October 17, 2016 13:02 IST2016-10-17T12:57:11+5:302016-10-17T13:02:43+5:30
'31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा'.

मुख्यमंत्रीसाहेब, आपल्या वाचाळ मंत्र्यांना आवरा - अजित पवार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 17 - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. '31 ऑक्टोबरला राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा', असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पुणे महानगरापालिकेने बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी नगरच्या जिल्हाधिका-यांनी बदली करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला आहे. महादेव जानकर यांच्यावर हल्लाबोल करत,'सत्ताधारी मंत्री जिल्हाधिका-यांना सालगडी समजतात का?, असा प्रश्नदेखील अजित पवार यांनी उपस्थित केला.
आणखी बातम्या
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी 'मराठा आरक्षणाबाबत सरकार फक्त ठराव करत आहे, दुसरे काही नाही' असे अजित पवार यांनी म्हटले. 'पोलीस आणि कायद्याची भीती राहिली नसल्याने बलात्काराचे प्रकार वाढत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत असल्याचे कारण देखील तेच आहे. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्या, अशी मागणी देखील अजित पवार यांनी यावेळी केली आहे.