शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मराठी-अमराठी वादात मुख्यमंत्र्यांनी घेतली उडी, फडणवीस ‘भय्या भूषण’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 5:59 AM

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे.

मुंबई : परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून आता भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यांतून येणारे लोक मुंबईच्या लौकिकात भर घालतात, असे विधान करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनसेने जोरदार टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ नाही तर ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा, असे प्रतिउत्तर मनसेने दिले आहे.घाटकोपर येथे बुधवारी शिक्षणमहर्षी आय.डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी उत्तर भारतीय आणि इतर राज्यांतून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढविला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केले. भाषा हे संपर्काचे साधन आहे, विवादाचे नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला होता.मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांचे कौतुक केल्याने मनसेने आता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळू शकत नाही, पण ‘भय्या भूषण’ पुरस्कार द्यायला हवा. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. लांगूलचालनाच्या या राजकारणात मुंबईच्या हिताचा विचार होत नसल्याचा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. शिवाय, फडणवीस यांनी भाषेच्या अभिमानासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकवणी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा असावा, कोणत्याही भाषेचा नाही, असा टोलाही लगावला.फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून आधीच मनसे आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. मनसेला जशास तसे उत्तर देत काँग्रेसने उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामुळे आता भाजपानेही परप्रांतीयांना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे. भाजपाच्या मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी अलीकडे उत्तर भारतीय हे मुंबईची शान असल्याचे वक्तव्य केले होते. आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य प्रांतातून येणाºयांमुळे मुंबई महान बनल्याचे सांगितल्याने मनसेला आयती संधी मिळाली आहे.मुंबईची नाडी महाराष्ट्रातपरप्रांतीयांमुळे मुंबई महान बनत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा खोडून काढण्यासाठी मनसेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानांचा आधार घेतला आहे. ‘मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती.मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यासाठी कामगारांचा पुरवठादेखील महाराष्ट्र करतो.महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदडो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही, अशा शब्दांत बाबासाहेबांनी राज्य पुनर्रचनेची मीमांसा केली होती. मनसेकडून सोशल मीडियात अशाच विचारांचे फोटो आणि वक्तव्ये व्हायरल केली जात आहेत.गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

टॅग्स :marathiमराठीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस